News And Updates
Learn about online correspondence courses. Get an overview of the program types, degree levels, requirements and course descriptions available for this field.
अंबाजोगाई दि. 25.12.2021 रोजी मानवलोक समाजकार्य महाविद्यालय अंबाजोगाई येथे महाविद्यालयीन पातळीवरचा पहिला दिक्षांत समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मानवलोकचे कार्यवाह श्री. अनिकेत लोहिया, प्रमुख अतिथी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नरेंद्र काळे व वसुंधरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरूण दळवे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना डॉ. नरेंद्र काळे म्हणाले की, मानवलोक समाजकार्य महाविद्यालय हे एक समाजकार्य विषयात गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणारे महाविद्यालय आहे. हे महाविद्यालयाचे भविष्य काळात निश्चितच जागतिक पातळीवर जाईल व समाजकार्य महाविद्यालयाने स्वायत्त दर्जा निर्माण करून विविध समाजकार्याशी निगडीत कोर्स सुरू करावेत अशी इच्छा व्यक्त केली तसेच या महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रतिवर्षी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये असतात ही अभिमानाची बाब आहे. अशा महाविद्यालयामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या गुणवत्तेत भर पडते. यावेळी वसुंधरा महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अरूण दळवे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी व आधुनिक पध्दतीचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे अशी इच्छा व्यक्त केली. दिक्षांत समारंभाचा अध्यक्षीय समारोप करतांना मानवलोकचे कार्यवाह मा. श्री. अनिकेतजी लोहिया म्हणाले की, पदवी प्राप्त विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या विकासामध्ये योगदान द्यावे असे आवाहन केले. हे महाविद्यालय गुणवत्ता वाढीसाठी विविध प्रयोग राबविते. महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी वेगवेगळया शासकीय व निमशासकीय स्तरावर कार्य करतांना आढळतात. आपत्ती व्यवस्थापन, शासनाच्या विविध प्रकल्पामध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी काम करतात ही अभिमानाची बाब आहे. या महाविद्यालयातून शिक्षण घेणारे विद्यार्थी दर्जेदार स्वरूपाची कामे करतांना दिसून येतात असे म्हटले. येणाÚया काळामध्ये सामाजिक समस्येशी निगडीत अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश जाधव यांनी केले तर सुत्रसंचलन प्रा. सुकेशिनी जोगदंड यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. रमा पांडे यांनी मानले. या कार्यक्रमाची सुरूवात पथसंचलन करून प्रमुख पाहुण्यांना व्यासपीठावर आणण्यात आले. दिक्षांत समारंभाची सुरूवात विद्यापीठ गीताने करण्यात आली. यावेळी शैक्षणिक वर्ष 2016-17, 2017-18 व 2018-19 मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवीचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.